Hello world!

कोल्‍‍हाप‍ूर श्‍ाहराच्‍या पश्चिमेस चार कि‍.मी. अंतरावर असलेलं कळ‍ंबा तर्फ‍ ठाणे गाव हे एक शिस्‍त बद्ध्‍ा, नियोजनबद्ध्‍ा असं गाव आहे. गावाची स्‍थाप‍ना इ.स. १८०० च्या दरम्‍‍यान झालेली आहे. सध्‍याचे कळ‍ंबा गाव कोल्‍‍हाप‍ूर श्‍ाहराला व कळ‍ंब्‍याला प‍ाण्‍याचा प‍ुरवठा करणारे “कळ‍ंबा तलाव” याच्‍या पश्चिमेस होते.

कोल्‍‍हाप‍ूर संस्थानाचे राजे त्‍‍यावेळ‍ी शि‍कारीसाठी कात्‍‍यायणी देवी या भागातील जंगलात शि‍कारीसाठी येत असत. राजर्षी छ‍.शाहु महाराज यांचे काळ‍ात बुदधीमत्‍‍तेतुन या भागात प‍ाण्‍ास्‍थ्‍ाळ‍ तयार केल्‍‍यास संप‍ूर्ण कोल्‍‍हाप‍ूर संस्थानाला प‍ाण्‍याची सोय होई‍ल म्‍‍हणुन या भागात इ.स. १८८७ मध्‍ये तलाब बांध्‍ाण्‍यात आला. तलावाप‍ासुन साय‍फन प‍द्ध्‍ातीने प‍ाट‍ाचे बांध्‍ाकाम करुन कोल्‍‍हाप‍ूर संस्थानास प‍ाणीप‍ुरवठा केला गेला.

तलाव बांध्‍ाकाम करावयाचे असल्‍‍यामुळ‍े तलावाचे पश्चिमेस वसलेलं जुने कळ‍ंबा गांव उठवून ते सध्‍या असलेल्‍‍या त्रिकोणी प‍ट‍्यामध्‍ये राजर्षी छ‍. शाहु महाराजांनी खो-खो  मै‍दानासारखे प‍ुर्व-पश्चिम, दक्षिण्‍ा-उत्‍‍तर अशा चार दिशांना रस्ते एकास जोडतील अशा प‍द्ध्‍ातीने कळ‍ंबा गावाची सुधारणा नव्याने करण्‍यात आली. गावात ग्रामीण्‍ा स्‍वच्‍छ‍ता अभियान राबवून स्‍वच्‍छ‍ता व १०० ट‍क्‍‍के हगण्‍ादारी मुक्‍‍त करण्‍यात आली आहे. गावाला कळ‍ंबा तलाव, ग्रा.प‍ं. मालकीची वि‍हीर हे माध्‍यम जल स्‍त्रोत आहे.